वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एअर इंडिया एक्सप्रेसच्या नवीन विमानाचे मुंबई विमानतळावर अनावरण करण्यात आले. एअर इंडियानंतर टाटा समूहाने बुधवारी आपल्या बजेट एअरलाइन ‘एअर इंडिया एक्सप्रेस’चे नवे रूप सादर केले. विमानाच्या मागील भागाची रचना मूळ कंपनी एअर इंडिया आणि बांधणी आर्ट यांच्या प्रेरणेतून तयार केली आहे. हा बदल कंपनीच्या परिवर्तन कार्यक्रमाचा एक भाग असल्याची माहिती यावेळी कंपनीने दिली आहे. विमानात एक्स्प्रेस ऑरेंज आणि एक्स्प्रेस टर्क्वाइज रंगांचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय विमानात दुय्यम रंग म्हणून टेंगेरिन आणि बर्फाचा निळा वापरण्यात आला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये सध्या एअर एशियाची 28 एअरबस, 26 बोइंग आणि 737 विमाने आहेत. मार्चअखेरीस एअरलाइन 23 नवीन बोईंग 737 मॅक्स विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे.









