गंगटोक
सिक्कीममध्ये अलिकडेच आलेल्या पूरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अद्याप देखील या पूरामुळे जीव गमाविणाऱ्या लोकांचे मृतदेह सापडत आहेत. आपत्तीच्या सुमारे दोन आठवड्यांनी बचावपथकाला आणखी दोन मृतदेह सापडल्याने बळींची संख्या वाढून 40 झाली आहे. तर अद्याप 76 लोक बेपत्ता आहेत. 4 ऑक्टोबर रोजी पहाटे ढगफुटी झाल्यावर तीस्ता नदीला पूर आला होता. या पूरामुळे सुमारे 88 हजार लोक प्रभावित झाले आहेत. काही मृतदेह शेजारी राज्य पश्चिम बंगालमध्ये तीस्ता नदीच्या सखल भागातील पात्रात आढळून आले आहेत









