मुंबई
हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात हुडकोचा समभाग शेअरबाजारात बुधवारी घसरणीत असताना दिसला. सदरचा कंपनीचा समभाग 9 टक्के इतका बीएसईवर इंट्रा डे दरम्यान घसरुन 81 रुपयांवर खाली आला होता. सरकारने कंपनीतील काहीसा हिस्सा ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. याचा नकारात्मक परिणाम समभागावर दिसला आहे. सरकार जवळपास 7 टक्के हिस्सा विक्री करणार असल्याचे समजते.









