नंदगड येथील घटना, धमकी दिल्याची तक्रार
वार्ताहर /नंदगड
पत्रकार असल्याचे सांगून फारूक धारवाडकर बेळगाव हे खानापूर तालुक्मयातील डॉक्टर्सना धमकी देत आहेत. त्यामुळे आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणी करणारी तक्रार नंदगड पोलिसात डॉ. किरण पाटील (नंदगड) यांनी सोमवारी दिली आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत डॉ. किरण पाटील यांनी असे म्हटले आहे की, मी गेल्या दहा वर्षापासून नंदगड येथे खासगी वैद्यकीय सेवा बजावत आहे. दि. 14 रोजी दुपारी फाऊख धारवाडकर (बेळगाव) यांनी मला धमकी दिली आहे. नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक एस. सी. पाटील यांनी तक्रार नोंद करून घेतली आहे. यावेळी खानापूर तालुका डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डी. ई. नाडगौडा, तालुक्मयातील डॉ. वैभव पाटील, शंकर पाटील, सागर चिट्ठी, पी. टी. पाटील, सागर नार्वेकर, सुनील पाटील आदींसह अनेक डॉक्टर उपस्थित होते.
डॉक्टर व अधिकाऱ्यांना त्रास
खानापूर तालुक्मयाबाहेरील काहीजण पत्रकार असल्याचे सांगून खानापूर तालुक्मयातील डॉक्टर्सना फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटून त्रास देत आहेत. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. अशा लोकांचा बंदोबस्त करावा म्हणून तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना डॉक्टर असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले आहे. खानापूर तालुक्मयातील अधिकृत पत्रकारांनी डॉक्टर असोसिएशनला सहकार्य करावे, अशी विनंती खानापूर तालुका पत्रकार संघटनेकडे केली आहे. शिवाय यापूर्वी शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत पीडीओना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार खानापूर तालुक्मयात घडला होता. त्यावेळी काही अधिकारी मूग गिळून गप्प बसण्याचा पवित्र अवलंबविला. पण यावेळी मात्र डॉक्टर असोसिएशनने अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी पोलीस स्टेशनचे दार ठोठावले. याबाबतची फिर्याद नंदगड पोलिसांनी नेंद करून घेऊन पुढील तपास चालवला आहे.









