वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
हांगझाऊ येथे अलिकडेच झालेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदक मिळविणारा ओडीशाचा भालाफेक धारक किशोरकुमार जेनाचा राज्याच्या क्रीडामंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळविले होते. तर जेनाने या क्रीडा प्रकारात 87.54 मी. चा भालाफेक करत रौप्यपदक घेतले. या क्रीडाप्रकारातील जेनाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरीमुळे जेनाने पुढीलवर्षी होणाऱ्या पॅरिस अॅलिम्पिकचे तिकिट आरक्षित केले आहे. ओडीशाच्या क्रीडा युवजन खात्याचे मंत्री टी. के. बेहरा यांच्या हस्ते येथील कलिंगा क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रामध्ये झालेल्या समारंभात सत्कार केला. यावेळी या समारंभाला एचपीसीचे चेअरमन दिलीप तिर्की, सिद्धार्थ दास तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.









