बचावकार्य सुरू : विरुधुनगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना
वृत्तसंस्था/ शिवकाशी
तामिळनाडूतील शिवकाशीनजीक फटाके तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये मंगळवारी एका मागोमाग एक असे दोन विस्फोट झाले आहेत. या विस्फोटात 18 जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. पहिला विस्फोट विरुधुनगर जिल्ह्यात शिवकाशीनजीक झाला. तेथील स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच तत्काळ तेथे अग्निशमन पथकाने धाव घेतली होती.
दुसरा विस्फोट त्याच जिल्ह्यातील कम्मापट्टी गावात अन्य एका कारखान्यात झाला आहे. दोन्ही स्फोटांमध्ये एकूण 13 जणांना जीव गमवावा लागल्याची पुष्टी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर विस्फोटामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. यापूर्वी अरियालूर जिल्ह्यात 9 ऑक्टोबर रोजी एका फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली होती. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला होता









