निसर्गाच्या सानिध्यात शाळेच्या नावाच्या आकारात बैठक व्यवस्था
सांगरूळ प्रतिनिधी
सांगरूळ हायस्कूल मध्ये माजी राष्ट्रपती डॉ . ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून अनोख्या पद्धतीने साजरा केला. विशेष म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात क्रीडांगणावर शाळेच्या नावाच्या आकारात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करून वाचन व सारांश लेखन केलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला .
विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचन प्रेरणा दिन शाळांमधून साजरा केला जातो . सांगरुळ हायस्कूलच्या सर्व .विद्यार्थ्यांना ग्रंथालय विभागातील सर्व पुस्तके देऊन त्यांचे वाचन घेण्यात आले व विद्यार्थ्यांना वाचलेल्या भागाचे सारांश लेखन करण्यास सांगण्यात आले .विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात बसून मनापासून वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनाचा आनंद लुटला व वाचनाचा आशय समजावून घेऊन त्याचे सारांश लेखन केले. विद्यार्थ्यांनी या या नावीन्यपूर्ण उपक्रमाप्रती अतिशय उत्साह दाखवून मनापासून वाचन केले व ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रति आदर व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था SHS म्हणजेच SANGRUL HIGH SCHOOL SANGRUL या शाळेच्या नावाचा शॉर्ट फॉर्म वापरून अनोख्या पद्धतीने करण्यात आली होती. याला विद्यार्थ्यांनी उत्साहात दाद दिली.
ग्रंथालय विभाग प्रमुख एस ए कोळी तसेच एम यु भिसे ए एस सुतार यांनी चला हाती देऊ ग्रंथालयातील पुस्तक, सशक्त करू विद्यार्थ्यांचे मस्तक या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देऊन वाचण्याची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्राचार्य एस एम नाळे पर्यवेक्षक एस. के. पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.









