आचरा प्रतिनिधी
आचरा गावचे सुपुत्र आणि सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेडचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी ( सीआयओ )सुधीर कानविंदे यांची मुंबई विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान मंडळावर निवड झाली आहे. ही नियुक्ती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ रविंद्र कुलकर्णी यांनी केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र मुंबई विद्यापीठ प्रभारी कुलसचिव सुनील भिरुड यांनी पाठविले आहे.
सुधीर कानविंदे यांची ही निवड ५ वर्षांच्या कालावधीसाठी झाली आहे. ते आता विविध महाविद्यालयांसाठी आयटी आणि प्रयोगशाळा सेटअप, अभ्यासक्रम नियोजन आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांसाठी आयटी प्रणाली अपग्रेडवर देखरेख करतील.
आयटी क्षेत्रातील त्यांचा 30हून अधिक वर्षांचा अनुभव मुंबई विद्यापीठाच्या सुधारणांमध्ये मोठा हातभार लावणार आहे. या अगोदर सुधीर कानविंदे यांनी आयपीए मिनिस्ट्री आफ पोर्टस,शिपिंग मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या पदावर काम केले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना तत्कालीन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते डिजिटल इंडिया मधील एक्झाम्पलरी कॅटेगरी मधील सर्वोत्तम प्लॅटिनम अवार्ड देवून गौरविण्यात आले होते. त्यांच्या या माहिती तंत्रज्ञान मंडळावरील निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.









