नवी दिल्ली :
रिटेलच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्टने आपला सप्टेंबरअखेरचा तिमाही नफा जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 623.35 कोटी रुपये इतका एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एवेन्यू सुपर मार्केट अंतर्गत डीमार्ट हे रिटेल चेन भारतभरामध्ये कार्यरत आहे. मागच्या वर्षी समान तिमाहीमध्ये कंपनीने 685.71 कोटी रुपये निव्वळ नफा प्राप्त केला होता. दुसरीकडे पाहता कंपनीच्या महसुलात मात्र 18 टक्के इतकी वाढ दिसून आली आहे. कंपनीने सप्टेंबर अखेरच्या तिमाही मध्ये 12624.37 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान तिमाहीमध्ये 10,638.33 कोटी रुपये महसूल प्राप्त केला होता.









