मुंबई :
ऑनलाइन गेमिंगच्या क्षेत्रातील कंपनी डेल्टा कॉर्पचे समभाग सोमवारी शेअरबाजारात घसरणीत असताना दिसले. कंपनीचे समभाग सोमवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 9 टक्के इतके घसरत 127 रुपयांवर खाली आले. जीएसटी विभागाने कंपनीला नुकतीच 6,384 कोटी रुपये भरण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. या नोटीसीचा परिणाम कंपनीच्या समभागावर दिसून आला. नोव्हेंबर 2022 नंतर कंपनीचा समभाग नीचांकी भावावर घसरला आहे.









