9 महिन्यात 9580 वाहनांची विक्री : विक्रीत 10 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील लक्झरी वाहन निर्माती कंपनी बीएमडब्ल्यू समूहाने 2023 मधील पहिल्या 9महिन्यांमध्ये कार विक्रीमध्ये 10 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने या नऊ महिन्यांमध्ये 9580 वाहनांची विक्री भारतात केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सदरची विक्री ही विक्रमी स्तरावर नोंदली गेली असल्याचेही सांगितले जात आहे. बीएमडब्ल्यू समूह अंतर्गत बीएमडब्ल्यू, मिनी आणि बीएमडब्ल्यू मोटर अशा तीन प्रकारांमध्ये वाहने कंपनी बाजारात विक्री करते. वरील तीनही गटामध्ये विक्रीचा टप्पा वरील संख्येप्रमाणे गाठण्यामध्ये कंपनीने यश मिळवले आहे.
वाहनांची विक्री अशी झाली
या अंतर्गत बीएमडब्ल्यू कारची विक्री 898 इतकी झाली असून मिनी अंतर्गत कारची विक्री 582 इतकी झाली आहे. याच दरम्यान जानेवारी ते सप्टेंबर कालावधीत प्रीमियम गटातील कंपनीच्या मोटरसायकलची विक्री ही 6778 इतकी झाली आहे. जी मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेमध्ये 26 टक्के अधिक नोंदली गेली आहे.
पहिल्या सहा महिन्यातील आणि नंतरच्या तिमाहीतील विक्री पाहता कंपनीने चांगली प्रगती दर्शवली आहे. नव्या वाहनांच्या सादरीकरणाला वेग देतानाच पुरवठा साखळी नियमीत आणि सुरळीत राखत वाहन विक्रीवर कंपनीने जोर दिला आहे.









