वन खाते अनभिज्ञ; ग्रामस्थांचा बळी गेल्यानंतर जाग येणार का?
वैभववाडी: प्रतिनिधी
फोंडाघाट पंचक्रोशीतील हवेलीनगर, वडादेवाडी, नवीनकुर्ली वसाहत, लोरे रस्ता उतार या ठिकाणी गेले पंधरा दिवस बिबट्याचा वावर असल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक भितीच्या छायेखाली आहेत.
गेले पंधरा दिवस फोंडाघाट पंचक्रोशीत दिवसा व रात्री बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. फोंडाघाट हवेलीनगरला लागून वन खात्याचे चेक पोस्ट आहे, असे असताना वन खाते अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहे.
पंधरा दिवसापुर्वी tv9 या वृत्त संस्थेने बातमी दाखविली होती. मात्र, वन खात्याने अद्याप त्या बिबट्याला जेरबंद केले नाही. वन खाते एखाद्या मनुष्याचा जीव गेल्यानंतर उपाय योजना करणार आहे काय? असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनामध्ये येऊ लागला आहे.
जिल्ह्याचे उपवनसंरक्षक यांनी तात्काळ या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.