भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर कऊन त्यांना प्रवाहात आणणार
कोल्हापूर प्रतिनिधी
काँग्रेसची राज्यातील परिस्थिती पाहिल्यास ती कुठे शिल्लक आहे का ? असे चित्र दिसत आहे, अस टोला भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. तसेच लवकरच जिह्यातील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून त्यांच्या शंकांचे निरसन आपण व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील करणार आहे. त्यांना प्रवाहात आणून कोणीही भाजपपासून दूर जाणार नाही, याची काळजी घेऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भवानी मंडप येथे शाही दसरा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर प्रसिध्दीमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
काँग्रेसचे नेते मुरली देवरा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाच्या चर्चेबाबत खा. महाडिक यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यातील काँग्रेसची स्थिती पाहिल्यास ती कुठे शिल्लक आहे का? अशी स्थिती आहे. आता ही किती लोक शिल्लक राहतील, याबरोबरच आता हा पक्षच शोधावा लागेल अशी स्थिती आहे. कार्यकर्त्यांना लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, विकासासाठी समाजकारण व राजकारणाची आवश्यकता असते, परंतु आपल्या नेतृत्वाकडून जर कोणतीही आशा दिसत नसेल तर अशा पक्षात कोण थांबणार. त्यामुळे कार्यकर्ते वेगळा पर्याय शोधतील.
कोल्हापूर जिह्यातील भाजपच्या नाराज जुन्या कार्यकर्त्यांशी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला, याबाबत विचारले असता खा. महाडिक म्हणाले, भाजपकडे मोठ्या प्रमाणात लोक आकर्षित होत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश होत आहेत. जिह्याची नवीन कार्यकारीणी करताना नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालण्यात आली आहे. परंतु त्यामध्ये काही नवे चेहरे घेतल्याने काही जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यातील काही प्रमाणात समजूत मी स्वत: काढली होती. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवसभर सर्वांशी चर्चा कऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच त्यांची नाराजी दूर कऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच मी व मंत्री चंद्रकांत पाटील हे जुन्या कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन करणार आहोत. कोणीही भाजपपासून दूर न जाता ते प्रवाहात येऊन कार्यरत राहतील, असा आमचा प्रयत्न राहणार आहे.