कसबा बावड्यात होणाऱ्या दुर्गामाता दौडच्या मार्गावर टिपु सुलतानाचा उल्लेख करून आक्षेपार्ह मजकूर लिहल्याने तणाव निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या मार्गावर एकत्र जमून या कृत्याचा तिव्र निषेध नोंदवला. तसेच काही लोकांच्यामुळे जर कसबा बावड्यातील परिस्थिती बिघडली तर त्याला प्रशासन जबाबदार असल्याचेही म्हटले आहे.
कसबा बावड्यात काही दिवसापुर्वी एका महाविद्यालयीन तरूणाने टिपु सुलतानाचा स्टेट्स ठेऊन आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. स्थानिक नागरिकांनी त्या तरूणाला बेदम चोप देऊन पोलीसांच्या स्वाधिन केले होते. या घटनेमुळे बावड्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीसांनी त्या तरूणाची चौकशी करून समज देऊन सोडून दिले होते.
आज दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर कसबा बावड्या दुर्गामाता दौड आयोजित केली जाते. या दौड मार्गावर आज सकाळी नागरिकांना टिपु सुलतानचा उल्लेख असलेला मजकुर आढळून आला. त्यामुळे आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी या मार्गावर येऊन तिव्र निषेध केला व यापुढे बावड्यात काही झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला.
यावेळी बोलताना आंदोलक म्हणाले, “बावड्यात एका आठवड्यात तीन घटना घडल्या आहेत. दुर्गादौडच्या मार्गावर टिपू सुलतानबाबत आक्षेपार्ह विधान लिहून त्याचे उदात्तीकरण केले जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभिर दखल नाही घेतली तर कसबा बावड्यात काही झाल्यास त्याला पुर्णता प्रशासन जबाबदार राहील.” असे म्हटले आहे.









