वृत्तसंस्था/ लखनौ
सलग पराभवानंतर पूर्ण विस्कळीत झालेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांची आज सोमवारी येथे होणार असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात गांठ पडणार असून त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न राहील. दोन्ही संघ या स्पर्धेत पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्ध ऑस्ट्रेलियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले, तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविऊद्ध पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे ते नेहमीचे वर्चस्व दिसून आलेले नाही.
पाच वेळा विजेते राहिलेले ऑस्ट्रेलिया त्यांच्या अत्यंत खराब धावसरासरीमुळे (उणे 1.846) नवव्या स्थानावर आहेत, तर लंकेचा संघ (धावसरासरी उणे 1.161) सातव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाला जर पुनरागमन करायचे असेल, तर त्यांना एकत्र येऊन सर्व विभागांत चांगली कामगिरी करण्याची नितांत गरज आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या मागील आठ एकदिवसीय सामन्यांपैकी सात गमावले आहेत. या स्पर्धेदरम्यान त्यांनी खेळाच्या तिन्ही विभागांत खराब कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दोन सामन्यांमध्ये तब्बल सहा झेल सोडले आहेत. या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही संघाने इतके झेल सोडलेले नाहीत.
त्यांचा गोलंदाजीतील माराही धार नसल्याप्रमाणे दिसत आहे. फलंदाजीतही ते सपशेल अपयशी ठरले आहेत आणि त्यांनी अजून 200 धावांचा टप्पा पार करायचा आहे. सलामीच्या सामन्यात भारताच्या फिरकी गोलंदाजीने आणि नंतर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी त्यांना हादरवले. पण त्रस्त आणि घसरलेल्या श्रीलंकेच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फॉर्मात येण्याची योग्य संधी मिळून शकते. ऑस्ट्रेलियन्स देखील येथील खेळपट्टीशी चांगलेच परिचित झाले आहेत. त्यांनी या शहरात जवळपास एक आठवडा सराव केलेला आहे आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्ध येथे ते खेळलेले आहेत.
कर्णधार पॅट कमिन्सने या आठवड्याच्या सुऊवातीला गोलंदाजांना बदलणार नाही असे सांगितलेले आहे. याचा अर्थ ऑस्ट्रेलिया कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क हे वेगवान त्रिकूट आणि अॅडम झाम्पा तसेच मॅक्सवेलच्या फिरकी माऱ्याला चिकटून राहील. श्रीलंकेनेही या स्पर्धेत आतापर्यंत खराब कामगिरी केली आहे. मागील दोन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण अनेक आघाडीच्या गोलंदाजांच्या अनुपस्थितीत त्यांची गोलंदाजी ही चिंतेची बाब राहिलेली आहे. कर्णधार दासुन शनाका हा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने कुसल मेंडिस श्रीलंकेचे नेतृत्व करेल. शनाकाच्या जागी चमिका कऊणारत्ने त्यांच्या माऱ्याला बळ देईल आणि तो आज सोमवारी खेळण्याची अपेक्षा आहे.
संघ: ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
श्रीलंका : कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल पेरेरा, पाथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ कऊणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डिसिल्वा, महीश थीक्षाना, दुनिथ वेललागे, कसून रजिथा, मथ्शा पाथिराना, दुनिथ वेललागे, दिलशान मदुशंका, दुशन हेमंथा, चमिका कऊणारत्ने.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









