.1 रिश्टर स्केल तीव्रता : हरियाणात केंद्रबिंदू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआर भागात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील फरिदाबाद परिसरात दुपारी 4:08 वाजता 10 किमी खोलीवर 3.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या नैसर्गिक आपत्तीचे हादरे इतके तीव्र होते की घाबरलेले लोक घरे आणि इमारतींमधून बाहेर आले. दिल्लीशिवाय नोएडा, गाझियाबादसह हरियाणातील इतर शहरांमध्येही भूकंपाची तीव्रता जाणवली. मात्र, या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. सुट्टीचा दिवस असल्याने लोक घरीच होते. याचदरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक कंपन जाणवल्याने अनेकजण घराबाहेर पडले. भूकंपानंतर प्रत्येकाला आपल्या जीवाची आणि मालमत्तेची काळजी वाटत होती.
यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी नेपाळमध्ये 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातील इतर भागात जोरदार हादरे जाणवले होते. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूपासून 700 किमी पश्चिमेला बझांग जिल्ह्यातील तालकोट भागात होता.









