दुहेरी हत्याप्रकरणी पाचवा आरोपी सीबीआयच्या ताब्यात
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने पाचव्या आरोपीला अटक केली आहे. सीबीआयने महाराष्ट्रातील पुणे येथून 22 वर्षीय पाओलुनमांग या आरोपीला पकडले आहे. दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी पाओलुनमांग हाच सूत्रधार असल्याचे सीबीआयचे मानणे आहे.
पाओलुनमांगला 11 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असली तरीही त्याची माहिती आता समोर आली आहे. अटकेनंतर आरोपीला गुवाहाटी येथील विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले, जेथे त्याची 16 ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी 1 ऑक्टोबर रोजी सीबीआयने चार आरोपींना अटक केली होती. यात दोन पुरुष, दोन महिलांचा समावेश आहे.
23 ऑक्टोबर रोजी मोबाइल इंटरनेटवरील बंदी हटल्यावर दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहाची छायाचित्रे समोर आली होती. ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. एका विद्यार्थ्याचे शीर धडावेगळे करण्यात आले होते. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह अद्याप हस्तगत झालेले नाहीत.









