दाखले देवून घरचा रस्ता : उद्धट उत्तरांनी प्राचार्य, पोलीस ही आवाक्
युवराज निकम इस्लामपूर
एका मुलीसाठी दोघांमध्ये अनेकदा ‘राडा’ होतो. हे आपण ऐकले व पाहिले आहे, पण, अहो आश्चर्यम….एका मुलाचे प्रेम मिळवण्यासाठी दोन महाविद्यालयीन तऊणींमध्ये महाविद्यालयाच्या गेटवरच जुंपली. दोघींनी एकमेकीला फ्रि स्टाईल मारले. चौकशी दरम्यान या मुलींच्या उद्धट उत्तराने प्राचार्य आणि पोलिसही आवाक् झाले. महाविद्यालय व्यवस्थापनाने अखेर कठोर पाऊले उचलून या गुणी विद्यार्थिनींच्या हातात ‘दाखले’ देवून घरचा रस्ता दाखविला.
शहरातील एक प्रसिध्द महाविद्यालय… या महाविद्यालयाचा शिक्षण, कला, क्रीडा यामध्ये नावलौकिक आहे. या महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावले आहे. पण, बीएस्सी-1 मध्ये असणाऱ्या या मुलींनी कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच एकमेकींच्या झिंज्या धऊन मारामारी करीत स्वत:ची व जन्मदात्या आई, वडिलांची अब्रू चव्हाट्यावर आणली. या दोन्ही मुली वाळवा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या सधन गावातील आहेत. शिक्षणातील करिअरच्या सुऊवातीलाच ‘त्या’ चुकीच्या मार्गाला लागल्या. दोघी एकाच वर्गात, चांगल्या मैत्रिणी. शहरात सध्या कॉफी हाऊसची क्रेझ वाढली आहे. या दोघी बसस्थानक परिसरातील एका कॉफी हाऊसमध्ये जावून बसत. त्यातूनच एकीचे कॉफी हाऊस चालक तऊणाशी सूत जुळले. काही दिवस हे सूत टिकले. पण, कालांतराने त्यांच्यात ब्रेकअप झाला. आणि त्याचे नवे सूत तिच्या मैत्रिणीशी जुळले. त्यामुळे एका ‘बॉयफ्रेंड’ साठी या दोघींत वारंवार खटके उडू लागले. आपला बॉयफ्रेंड डावलत असूनही ‘ए’ त्याला सारखा फोन करीत असल्याचे ‘बी’ ला समजले. आणि अचानक दोन दिवसांपूर्वी स्फोट झाला.
बुधवारी दुपारी या दोघींमध्ये चांगलीच जुंपली. कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच मुलांना लाजवेल, अशा पध्दतीने या दोघींनी राडा केला. यामध्ये एकीची बहीण मदतीसाठी सरसावली. झिंज्या पकडून, ओचकरत-बोचकरत फ्रि स्टाईल मारामारी झाली. रस्त्यावऊन जाणाऱ्या नागरिकांनी ही मारामारी बघून तोंडात बोटं घातली. हे भांडण गुऊवारपर्यंत धुमसत राहिले. दोघींनी अन्य कॉलेजमधील मैत्रिणींची जमवा-जमव कऊन पुन्हा मारामारीची तयारी केली. पण, महाविद्यालयात व्यवस्थापनाच्या ही बाब लक्षात आली. प्राचार्य व प्राध्यापक अॅक्शन मोडवर गेले.
निर्भया पथकाच्या पोलिसांनी महाविद्यालयात जावून प्रचार्यांसमोरच या मुलींची चौकशी केली. सुऊवातीला भांडणाच्या मूळ कारणाबाबत त्यांनी ताकास तूर लागू दिली नाही. पण, हळूहळू त्यांनी सर्व नाजूक गोष्टींचा उलगडा केला. दरम्यान, या तिन्ही मुलींची भाषा मग्रूरीरीची होती. अखेर त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात आले. एकीच्या घरचे पालक आले नाहीत, पण तिने गुन्हेगारी क्षेत्रातील मानलेले भाऊ कॉलेज बाहेर तयार ठेवले होते. त्यांना काही प्राध्यापकांनी घालवून दिले. शेवटी तिन्ही मुलींना दाखला देवून त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. मुलींच्या या कृत्यांनी पालकांची मान खाली गेली. पोलिसांनी या तिन्ही मुलींना पोलीस ठाण्यात नेवून जुजबी कारवाई कऊन समज देवून सोडून दिले. या आगळ्या-वेगळ्या प्रकरणाने कॉलेजमधील प्राध्यापक व अन्य विद्यार्थिनी चकीत झाल्या आहेत.
बॉयफ्रेंड’चा कोडवर्ड ‘बीएफ’
या मुलींची चौकशी सुऊ असताना पोलीस व प्राचार्यांना सुरुवातीला त्यांनी कारणाचा पत्ताच लागू दिला नाही. पोलीस व पालकांनी दटावून मोबाईलची मागणी केल्यानंतर मोबाईल देण्यास ही टाळाटाळ केली. हळूहळू या मुली बोलत्या झाल्या. दरम्यान, या प्रकरणातील एका मुलीने ‘बीएफ’ असा शब्द प्रयोग वापरला. या शब्दप्रयोगाने सारेच भांबावून गेले. दरम्यान, दुसऱ्याच एका मुलीने बीएफचा अर्थ बॉयफ्रेंड असा सांगितल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला, असे कितीतरी शब्दप्रयोग मुलींच्या डिक्शनरीत सापडण्याची शक्यता असल्याची चर्चा झाली.









