वारणानगर प्रतिनिधी
वारणानगर येथून जवळच असलेल्या बाबू पार्क बहिरेवाडी ता.पन्हाळा) येथीलआनंद भीमराव पाटील यांच्या घरात कोण नसल्याचा फयदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे गज उचकटून घरातील चार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र,रोख रक्कम १ हजार २०० रू. असा एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शुक्रवार दि.१३ रोजी सकाळी उघडकीस आली असून अज्ञात चोरट्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबत घटनास्थळा वरून व पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, आनंद पाटील यांचे मुळ गाव कोरेगाव (ता. वाळवा) हे आहे. नोकरी निमित्त त्यांनी बहिरेवाडी येथील बाबू पार्क येथे घर बांधले आहे. घरातील सगळे शेतातील भुईमूगाच्या शेंगा काढण्यासाठी कोरेगाव येथे शनिवार दि.७ रोजी गेले होते. आज शुक्रवार दि.१३ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलगा घरी आला असता त्याने घराचा मुख्य दरवाजा उघडून घरात प्रवेश केला असता बेडरूम मधील लाकडी कपाटातील साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत दिसले असता त्याने पाहणी केली असता हॉलच्या खिचडीचे गज उचकटलेले दिसले. यातून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील ४ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख बाराशे रुपये असे अंदाजे एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरटा पसारा झाला.याबाबत सहा. पोलीस निरीक्षक एस. ए. डोईजड, फौजदार नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.









