नवी दिल्ली
रंग उत्पादक कंपनी शालीमार पेंटस् आर्थिक वर्ष 2023-24 व 2024-25 करीता 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे समजते. कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. सदरचा खर्च हा कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी केला जाणार आहे. या आर्थिक वर्षात 20 ते 25 टक्के इतकी व्यवसायात वाढ अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या आर्थिक वर्षात कंपनीने 45 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता.









