मुंबई
हवाई क्षेत्रातील कंपनी इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांची सध्याला स्पाइसजेटमध्ये हिस्सेदारी घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे समजते. सध्याला स्पाइसजेट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गंगवाल व त्यांच्या पत्नी शोभा यांचा अनुक्रमे इंडिगोत 13.23, 2.99 टक्के इतका वाटा आहे. पुन्हा हिस्सेदारी घेण्याचा विचार आहे पण किती ती माहिती उपलब्ध झालेली नाही. या बातमीनंतर स्पाइसजेटचे समभाग 20 टक्के इतके वाढलेले दिसले.









