नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील कंपनी अजमेरा रिअॅल्टी आणि इन्फ्रा इंडिया लिमिटेड यांच्या घर विक्रीत 52 टक्के वाढीव प्रतिसाद ग्राहकांकडून प्राप्त झाल्याची माहिती आहे. सदरच्या घर बुकिंगमधून कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 252 कोटी रुपये प्राप्त केले आहेत. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने बुकिंगच्या माध्यमातून 166 कोटी रुपये प्राप्त केले आहेत. प्रकल्पातील घरांच्या मागणीत ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून आगामी काळातही तो लाभेल असा विश्वास संचालक धवल अजमेरा यांनी व्यक्त केला आहे.









