मुंबई
भारतातील एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीने आपला दुसऱ्या तिमाहीतला नफा जाहीर केला आहे. याअंतर्गत कंपनीने सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत 15 टक्के अधिक नफा प्राप्त केला आहे. मुंबईतील कंपनीने करपश्चात नफा 3.77 अब्ज रुपयांचा मिळवला आहे. वर्षाआधी सदरच्या तिमाहीत हाच नफा 3.26 अब्ज रुपये इतका होता. कंपनीने आर्थिक वर्ष 202-24 मध्ये प्रिमीयम विक्रीत 9 टक्के वाढ दर्शवली आहे. एचडीएफसीचे समभाग शेअरबाजारात नफ्याच्या निकालानंतर 0.11 टक्के वाढत इंट्रा डे दरम्यान 625 रुपयांवर पोहचले होते. नव्या उत्पादनांच्या सादरीकरणासोबत व्यवसायसुलभतेमुळे कंपनीने चांगली प्रगती साधली आहे. नव्या व्यवसायात प्रिमीयमच्या माध्यमातून पहिल्या आर्थिक सहामाहीत 10 टक्के विकास साधला आहे. कर सवलत काढून घेण्याच्या सरकारच्या योजनेनंतरही कंपनीने तिमाही नफ्यात चांगली कामगिरी नोंदवली आहे.









