केळं घ्या …केळं….!असे म्हणत कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुशिक्षित बेरोजगारांनी बाजार मांडून कंत्राटी भरतीच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनात कुणी केळी विकली तर कुणी भेळ विकली. राज्यसरकारने काढलेल्या कंत्राटी नोकरीच्या विरोधात केलेल्या बेरोजगारांच्या या अनोख्या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संभाजी ब्रिगेडने या आंदोलनाचे नेर्तृत्व केलं.
आत्तापर्यंत विविध परीक्षांच्या माध्यमातून शासकिय कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत होती. पण गेल्या काही वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्यात येत असले तरी त्यात शिपाई, सफाई कामगार अशा किरकोळ पदे ही कंत्राटी पद्धतीने भरली जात होती. मात्र त्याची व्यापकता वाढवून त्याजागी अनेक महत्वाची पदेही भरण्यात येणार असल्याचे पत्रक काही दिवसापुर्वा माध्यमांमध्ये झळकत होते.
संभाजी ब्रिगेड या संघटनेने शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करताना अनोखे आंदोलन केले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केळी, खाद्यपदार्थ विकून बेरोजगारांना आता याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्यशासनाच्या विरोधात खाऊ गल्ली उभारून निषेध करण्यात आला. कपडे इस्त्रीवाला भेलदुकानवाला, केळीवाला, ताकवाला अशा पद्धतीची दुकाने उभा करण्यात आली होती. या आंदोलनात एमबीएचे शिक्षण घेतलेला युवर बनला कपडेवाला, तर तर बीएससीचे शिक्षण घेतलेला युवकाने केळी विकली आहेत.
यावेळी संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटीकरणाचा निर्णय शासनाने त्वरित रद्द करण्याची मागणी केली. देशात बेरोजगारीचा उचांकी दर आहे. सुशिक्षित बेरोजगारी संपवा, अन्यथा नक्षलवादी तयार होतील. तसेच शाळा दत्तक योजना रद्द करण्याचीही मागणी या आंदोलनातून करण्यात आली.








