PSI यांचाही लाच प्रकरणात समावेश; पथकाची माहिती
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील यांचाही लाच प्रकरणात समावेश आहे. एकाच पोलीस ठाण्याचे दोन प्रमुख अधिकारी पहिले म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना रायगड येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर या प्रकरणात सावंतवाडीचे पोलिस उपनिरीक्षक असलेले सुरज पाटील यांचाही यात समावेश असल्याचे कळतेय. मात्र ते आज मंत्री महोदय यांच्या दौऱ्यात होते. मात्र, त्यांचा शोध पथक करत आहे .लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे. या लाच प्रकरणात आणखीन दोन बडे अधिकारी यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.









