आयबीच्या अलर्टनंतर झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. विदेशमंत्र्यांची सुरक्षा वाढवून झेड श्रेणीची करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. इंटेलिजेन्स ब्युरोकडून अलर्ट देण्यात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. जयशंकर याहंच्या सुरक्षेत आता सीआरपीएफचे कमांडो असणार आहेत. झेड श्रेणीच्या सुरक्षेत 36 सीआरपीएफ कमांडो तैनात असणार आहेत. केंद्र सरकारने सुरक्षेसाठी पाच श्रेणी निश्चित केल्या आहेत. यात एक्स, वाय, वायप्लस, झेड आणि झेड प्लस सामील आहे. धोक्याच्या तीव्रतेनुसार व्यक्तीला सुरक्षा पुरविण्यात येते. झेड प्लस श्रेणीच्या सुरक्षेवर दर महिन्याला सुमारे 15-20 लाख रुपयांचा खर्च येत असतो.









