पुलाची शिरोली/प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेला विरोध करण्यासाठी पुलाची शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत बैठकीत घेण्यात आला होता. गुरुवारी हा बंद व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक व ग्रामस्थांनी सहकार्य केल्याने १०० टक्के बंद यशस्वी झाला असल्याचे सरपंच सौ. पद्मजा करपे यांनी स्पष्ट करीत सर्वांचे आभार ही मानले.
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीत १८ गावांचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याला कडाडून विरोध करण्याचा निर्णय कोल्हापूर महापालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने गुरुवारी शिरोली गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार १००% बंद ठेवून सर्व व्यवसायक व ग्रामस्थांनी बंदला पाठिंबा देऊन सहकार्य केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हद्दवाढीच्या विरोधात माजी उपसरपंच राजेश पाटील, क्रूष्णात करपे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख बाजीराव पाटील, दिपक यादव यांची भाषणे झाली. त्यानंतर कोल्हापूर महापालिका हद्दवाढ राक्षस प्रतिकात्मक पुतळ्याचे ग्रामपंचायत चौकात दहन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच अविनाश कोळी, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे,तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, शिवाजी करपे, महंमद महात, विजय जाधव, योगेश खवरे, बाळासाहेब पाटील, धनाजी पाटील, श्रीपती पाटील, बाबासाहेब बुधले, संतोष यादव, सचिन शिंदे, मन्सूर नदाफ, मुकुंद नाळे, हिदायत्तुल्ला पटेल, बटील देसाई, संपत संकपाळ, विनोद आंची, यांच्यासह ग्राम पंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.