ग्रा. पं.अध्यक्ष, पीडीओ, महिला संघांना तज्ञांकडून प्रशिक्षण
वार्ताहर /नंदगड
गावातील प्रत्येक व्यक्तीला अन्न, पाणी, शिक्षण, अरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून सरकार वेगवेगळ्या परीने प्रयत्न करीत आहे. मोठ्याप्रमाणात निधी खर्च करण्यात येत आहे. महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत प्रत्येकाच्या हाताला काम देण्यात येत आहे. त्यामुळे माणसे आता बऱ्यापैकी चांगले जीवन आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक ग्रामपंचायतीला गावातील कचरा गोळा करण्यासाठी चारचाकी वाहनाची सोय केली आहे. गावातील कचरा एकत्रित करून तो कचरा डेपोमध्ये टाकण्यात येत आहे. तर काही ठिकाणी कचऱ्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. गावातील कचरा व्यवस्थितपणे गोळा करावा, यासाठी ग्रा. पं. अध्यक्ष, पिडीओ व संबंधित गावातील महिला फेडरेशनच्या अध्यक्षा, कचरा संकलन कमिटीतील सदस्यांना एकदिवसीय प्रशिक्षण ता. पं. सभागृहात आयोजित केले होते. प्रशिक्षण उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ता. पं. कार्यकारी अधिकारी विरनगौड एगनगौडर होते.
हलगा ग्रा. पं. अध्यक्ष महाबळेश्वर पाटील, महिला फेडरेशनच्या अध्यक्षा नेहा नाईक (नंदगड) यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. यावेळी रोहयोचे सहाय्यक संचालक एम. जी. देवराज, विविध ग्रा. पं.चे अध्यक्ष, पिडीओ, विविध ग्राम पंचायत लेवल फेडरेशनच्या अध्यक्षा, स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी लक्ष्मीकांत देवरमणी व विजया नेसर्गी या तज्ञांनी कचरा गोळा करण्यासंदर्भात, कचऱ्याची विल्हेवाट, त्या कचऱ्यापासून बनवण्यात येणाऱ्या अन्य वस्तू याबाबत सविस्तर माहिती सांगितली. देशाच्या विविध ठिकाणी गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्याविषयी कांही उदाहरणे त्यांनी दाखविली. गंदिगवाड पिडीओ बालराज बजंत्री यांनी ग्राम पंचायतमध्ये शंभर टक्के कचरा गोळा करण्याचे काम व्यवस्थितपणे सुरू आहे, असे सांगितले.ता. पं. कार्यकारी अधिकारी विरनगौड एगनगौडर म्हणाले, कोणतेही काम करताना ते आपल्या घरचे काम आहे. असे समजून प्रामाणिकपणे काम करावे. विविध माध्यमाद्वारे लोकांत जागृती निर्माण करावी. स्वच्छतेबद्दल माहिती द्यावी. आरोग्यसंपन्न व सुखी जीवनाबद्दल वेळोवेळी माहिती दिली. तर एक दिवस तालुक्मयातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्थितपणे कचरा गोळा करण्याचे काम निश्चित होईल.









