खाण्यापिण्याची अन् कपड्यांची घेणार काळजी
जेव्हा मुले शिकण्यासाठी घरातून बाहेर पडतात तेव्हा ते परगावी नीट राहत आहेत की नाही याची चिंता त्यांच्या आईवडिलांना सतावत असते. ज्या मुलांना स्वत:चे काम स्वत: करण्याची सवय नसते, ती स्वत:चे जेवण अन् कपडे धुणे त्यांना इस्त्राr करण्यासाठी काय करत असतील असा प्रश्न त्यांच्या आईवडिलांना सतावत असतो. याची चिंता दूर करण्यासाठी एक खास सेवा सुरू करण्यात आली आहे.

युनायटेड स्टेट्समध्ये कॉलेज विद्यार्थ्यांसाठी रेंट अ मॉम म्हणजेच आई भाडेतत्वावर मिळविण्याची सेवा सुरू ओह. यात जी महिला या विद्यार्थ्यांसाठी आई होईल ती त्यांच्या जीवनात खऱ्याखुऱ्या आईप्रमाणे सुविधा देईल. कॉलेज विद्यार्थ्यांसाठी त्यांना मार्गदर्शन करण्यापासून त्यांच्या जेवणाची अन् कपडे सांभाळण्याची काळजी रेंटेड मम्मी घेणार आहे.
आई भाडेतत्वावर मिळविण्याच्या या सेवेचे शुल्क 10 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 8 लाख 23 हजार रुपये प्रति शैक्षणिक सत्र इतके असणार आहे. टॅम्मी कुमिन नावाची महिला आता 70 वर्षांची असून ती या सेवेत सामील आहे. ती स्वत: 3 मुलांची आई अन् 6 मुलांची आजी आहे. या वयात देखील ती इमर्जन्सी ग्रॉसरी शॉपिंग, कुकिंग अन् कपडे धुण्याची व्यवस्था हाताळते. त्यांनी स्वत:लाच भाडेतत्वावर उपलब्ध केले आहे. ती अशा विद्यार्थ्यांसाठी आईचे कर्तव्य पार पाडते जी घरापासून दूर राहत आहेत. कॉनर्सियज सर्व्हिस फॉर स्टुडंट्स नावाने त्यांची सेवा चालते, त्या प्री-बोर्डिंग स्कूल, बोर्डिंग स्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतात.
1993 पासून सुरू आहे सेवा

टॅम्मी कुमिन यांनी 1993 पासून ही सेवा सुरु केली आहे आणि अमेरिकनसोबत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही त्या मदत करत आहेत. त्यांची सेवा मिळविल्यावर स्वत:च्या मुलांना वेळेत जेवण मिळणार याबद्दल त्यांचे आईवडिल निश्चिंत होतात. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणात मार्गदर्शन, ब्यूटी अणि स्पा अपॉइंटमेंट बुकिंग, डिनर रिझर्व्हेशन आणि जिम मेंबरशिपसोबत घर-फर्निचर शोधणे, पार्टी प्लॅनिंग, डॉक्टर आणि बँकिंगमध्ये देखील मदत मिळते. 24 तास ऑन कॉल असिस्टेंस मिळतो. त्यांची सेवा प्राप्त करणाऱ्या मुलांना आपलेपणाची वागणूक देखील मिळते.









