मुंबई
पात्रताधारक संस्थांकडून पैसे उभारणी करण्याच्या वृत्ताने लक्ष्मी ऑरगॅनिकचा समभाग बुधवारी शेअरबाजारात उसळी घेताना दिसला आहे. सदरचा कंपनीचा समभाग बुधवारी 13 टक्के इतका शेअरबाजारात वधारत 308 रुपयांवर पोहचला होता. याआधीच्या सत्रात हा समभाग 271 रुपयांच्या भावावर बंद झाला होता. कंपनी 259 कोटी रुपयांची उभारणी संस्थांकडून करणार असल्याचे समजते. या आधी 29 मार्च 2023 रोजी समभाग 220 या नीचांकी भावावर कार्यरत होता.









