वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आपल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात काही अत्यंत अडचणीच्या क्षणातून मार्ग काढण्यात यश मिळविलेल्या भारताची नजर आज बुधवारी येथे होणार असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात अफगाणिस्तानविऊद्ध सहज विजय मिळविण्यावर राहील. चेपॉक येथील संथ आणि फिरत्या खेळपट्टीनंतर फिरोजशाह कोटला येथे अधिक चांगली खेळपट्टी लाभणे अपेक्षित आहे. तेथे गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात 700 हून अधिक धावा लुटल्या गेल्या.
डेंग्यूमुळे शुभमन गिलला खेळता येणार नसून त्यामुळे रोहितसोबत इशान किशनला सलामीला आणखी एक संधी मिळेल. ऑस्ट्रेलियाविऊद्ध किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या खराब फटक्यांमुळे भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. ते दोघेही अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अधिक हुशारीने वागतील अशी अपेक्षा आहे. जर गिल तीन दिवसांनंतर होणार असलेल्या पाकिस्तानच्या सामन्यासाठीही पूर्ण तंदुऊस्त होऊ शकला नाही आणि आज किशनकडून चांगली खेळी झाली, तर त्याला पदार्पणाच्या विश्वचषक स्पर्धेत त्याची फार मोठी मदत होईल.
त्यातच तुलनेने जोश हेझलवूड व मिचेल स्टार्कपेक्षा अफगाण माऱ्याचा सामना करणे सोपे जाईल. मैदानाचा छोटा आकार देखील फटकेबाजीला मदत करेल. चेन्नईमध्ये रविवारी रात्री के. एल. राहुलसमवेत दमदार खेळी केलेल्या विराट कोहलीकडून त्याच्या चाहत्यांना आणखी एक तशीच खेळी अपेक्षित असेल. कोहलीला यावेळी त्याचे नाव दिलेल्या पॅव्हेलियनसमोर खेळण्याची संधी मिळेल. गेल्या महिन्यात झालेल्या आशिया चषकापासून राहुल भारतीय फलंदाजीचा मुख्य आधार राहिलेला आहे.
गोलंदाजीत भारताला परिस्थिती लक्षात घेऊन बदल करणे भाग पडू शकते. भारताने ऑस्ट्रेलियाविऊद्ध गोलंदाजीच्या आघाडीवर चांगली कामगिरी करताना मधल्या षटकांमध्ये तब्बल सहा बळी मिळविले. जर भारताने तीन फिरकीपटूंसह उतरणे पसंत केले नाही, तर मोहम्मद शमी आर. अश्विनच्या जागी खेळू शकतो. संघात तोच एकमेव बदल होऊ शकतो.
बांगलादेशविऊद्धच्या दाऊण पराभवानंतर अफगाणिस्तानसमोर दिल्लीमध्ये परिस्थिती बदलण्याचे लक्ष्य असेल. गोलंदाजी, मुख्यत: फिरकीपटू ही अफगाणिस्तानची ताकद असून जर त्यांना या विश्वचषकात प्रभाव पाडायचा असेल, तर त्यांच्या फलंदाजांनाही नीट योगदान द्यावे लागेल. सलामीवीर रेहमानउल्ला गुरबाज हा त्यांचा एकमेव फलंदाज फॉर्मात आहे. गोलंदाजीत सहसा फिरकीपटू मुजिब झद्रान वेगवान गोलंदाजासह मारा सुरू करतो, तर पॉवरप्लेनंतर त्यांचा मुख्य गोलंदाज रशिद खान येतो.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर.
अफगाणिस्तान-हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रेहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रेहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलिखील, अजमतुल्ला ओमरझाई, रशिद खान, मुजीब उर रेहमान, नूर अहमद, फजलहक फारूखी, अब्दुल रेहमान, नवीन उल हक.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









