दाहोद :
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात दाहोद-अलीराजपूर महामार्गावर मंगळवारी सकाळी एका रिक्षाने ट्रकला धडक दिली आहे. या दुर्घटनेत एक महिला तसेच मुलासमवेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांचा मृत्यू घटनास्थळीच झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेत रिक्षाचालक कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.









