बुध. दि. 11.10.2023 ते मंगळ. दि. 17.10.2023 पर्यंत
सोशल मीडियावर महालय श्राद्ध, महालय अमावास्या, पितृपक्ष, पितरांचे शाप इत्यादी विषयांवरती व्हीडिओज आणि माहितीचा महापूर आला असेल आणि तुम्ही तो पाहिलाही असेल. श्र्रद्धाच नसेल तर श्राद्ध करून उपयोग काय? श्राद्धपक्ष किंवा पितृपक्ष हा आपल्या पितरांच्याबद्दल आपली असलेली श्र्रद्धा व्यक्त करण्याचा काळ आहे. आपण जन्मलो आपल्या आई-बाबांच्या पोटी. ते जन्मले ते त्यांच्या आई-वडिलांच्या पोटी. म्हणजे आपल्या तिसऱ्या पिढीवरती चार माणसे आहेत, त्या चार पितरांच्या वरती 8, त्यांच्यावरती 16. या पद्धतीने बारा पिढ्यांपर्यंत आपले एकंदर पितर 4094 होतात. म्हणजे कमीत कमी इतक्मया लोकांचे कर्ज आपल्यावरती आहे. आपले दिसणे, असणे, वागणे, बोलणे. थोडक्मयात आपला डीएनए हा त्यांच्यापासून आलेली वरदानऊपी साखळी आहे, मग त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला नको का? पहिल्यांदा लक्षात घ्या की महालय काळ हा पंधरा दिवसांचा नसतो. हा साठ दिवसांचा असतो. सूर्य जेव्हा कन्या राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसापासून सूर्य जेव्हा वृश्चिकेमध्ये प्रवेश करतो (पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंब वर्तुळाकार असल्याने सूर्यामधील आणि पृथ्वीमधील अंतर लक्षात घेता सूर्यलोक पृथ्वीच्या जवळ असतो आणि त्या माध्यमातून पितृ लोकातील पितरांना आर्यमा देवतेच्या सहाय्याने स्वधा देवीच्या माध्यमातून त्यांचा भोग मिळण्याकरता सोपे जाते) तोपर्यंतचा 60 दिवसांचा काळ हा पितरांचा काळ आहे आणि या 60 दिवसांमध्ये श्राद्ध कर्म केले जाऊ शकते. म्हणजेच पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचा जो सोळा दिवसांचा काळ आहे तेवढाच काळ नसून यावषी 17 सप्टेंबरला सुरू झालेला हा काळ 17 नोव्हेंबरपर्यंत आहे. (बहुतेक घरांमध्ये आणखी एक चूक होते, ती ही की एखादी व्यक्ती दगावल्यानंतर येणाऱ्या पहिल्या महालयाच्या पहिल्या दिवशी महाळ केले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. याकरता सर्वोत्तम म्हणजे एखादी जवळची व्यक्ती दगावल्यानंतर ती ज्या दिवशी दगावली त्या दिवशी कोणती तिथी होती r(कोणत्याही हिंदू पॅलेंडरमध्ये हे सहज सापडू शकते) हे पाहून महालयात त्या तिथीला त्या व्यक्तीचे श्राद्ध करावे.) श्राद्ध हे नित्य (रोज केले जाणारे), नैमित्तिक आणि काम्य (एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून) असू शकते. मागच्या लेखामध्ये मी एक शंका मांडली होती की जर माणसाला पुनर्जन्म आहे तर मग पितृ लोक किंवा आपले पितर हे राहतात कुठे? हे त्यांना मिळणाऱ्या गतीवर अवलंबून आहे. जरा समजून घेऊया. अगदी अलीकडच्या काळामध्ये झालेल्या थेरॉटिकल फिजिक्स आणि काँटम फिजिक्समधील संशोधनातून मल्टीव्हर्स म्हणजे बहु ब्रम्हांडीय अस्तित्वाचा उल्लेख आहे. झ्. अ ध्ल्sजहेक्ब् च्या सिद्धांतानुसार प्रत्येक क्षणी अनंत ब्रम्हांडे निर्माण होतात आणि नष्ट होतात. मानवी मन हे एका दिशेने विचार करण्याच्या मर्यादेने बांधलेले असल्याने इतर शक्मयतांबद्दल विचार करण्याची कुवत त्याच्यामध्ये नसते. आजचे विज्ञान ज्या मल्टीव्हर्सबद्दल बोलत आहे त्याबद्दल अनेक धर्मांमध्ये अनेक पद्धतीने भाष्य आहे. आपण म्हणतो ‘अनंत कोटी ब्रम्हांडनायक..’ म्हणजे काय तर या ब्रम्हांडासारख्या अनंत ब्रम्हांडांचा स्वामी, कुराणमध्ये (सुरा 65:12) म्हटल्याप्रमाणे ‘अल्लाह ज्याने सात स्वर्ग आणि अनेक पृथ्वी निर्माण केल्या.’ यामध्येसुद्धा मल्टीव्हर्सचाच उल्लेख आहे. म्हणजे पितृ लोक, पाताळ लोक, देवलोक, सूर्यलोक इत्यादी आपल्या पुराणांमध्ये वर्णिलेले लोक ही एक प्रकारची विविध ब्रम्हांडे जे क्षणोक्षणी निर्मित होतात आणि नष्ट पावतात, असे असू शकत नाही का? नक्कीच असू शकते. आणि या प्रकारे जर विचार केला तर काळ किंवा वेळ ही सुद्धा सापेक्ष आहे. म्हणजे पृथ्वीवरती जी वेळ आहे ती चंद्रावरती नसेल. पृथ्वीचा एक दिवस म्हणजे गुऊ ग्रहावरती एक तास असू शकतो. बरोबर ना? याचाच अर्थ इतर ब्रम्हांडांमध्ये राहणाऱ्या लोकांकरता काळाची संकल्पना वेगळी असेल. सनातन संस्कृतीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे देवांचा किंवा पितरांचा एक दिवस म्हणजे माणसाचे एक वर्ष. आणि श्राद्ध काल हा मानवी वर्षाच्या ज्या वेळेला येतो ती वेळ म्हणजे पितरांची दुपार असते आणि त्यामुळे आपण त्यांना पिंडदान किंवा जेवण कृतज्ञतापूर्वक देतो. याचा अर्थ आपण वर्षातून एकदा त्यांना जेवायला घालतो असा नाही तर त्यांच्या कालमानाप्रमाणे आपण रोज दुपारी त्यांना जेवण देतो. म्हणजे ही 2 विश्वामधली एक प्रकारची अंतरमितीय देवाणघेवाण आहे (ऊraहे-असहेग्दहत् ण्दस्स्ल्हग्म्atग्दहे (ऊअ) थीयरी- मार्क मेसी, संशोधक). आपल्या संस्कृतीमध्ये विविध समाजांमध्ये श्राद्धाचे विविध प्रकार असले तरी एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे आपण केवळ आपल्या पितरांनाच नाही तर आपण यापूर्वी जन्म घेतलेल्या सगळ्या योनींमध्ये जे आपले पितर होते त्यांना, आपल्या गुऊजनांना, आपल्यासंबंधी आणि मित्रांना इतकेच काय तर आपल्याकडे काम करणाऱ्या सेवकांचेदेखील स्मरण या श्राद्धात करतो. ही सुंदरता केवळ सनातन धर्मातच आहे. .
मेष
तब्येत आणि भाग्य दोन्ही तुमच्या बाजूने आहे. पैशाची आवक वाढेल. कुटुंबात एखादा छोटा समारंभ साजरा कराल. प्रवासामधून फायदा होईल मात्र चिंता असेल. जमिनीबद्दलचे व्यवहार सध्या करू नका. वाहनाकरता खर्च करावा लागेल. प्रेमींनी सांभाळून राहावे. धोकादायक गुंतवणूक होण्याची शक्मयता आहे.
उपाय मसूर दान करावे
ऋषभ
छोटे आजार त्रास देऊ शकतात. वेळेवर उपचार करून घ्या. धनप्राप्तीमधील अडथळे दूर होतील. कौटुंबिक वातावरण गोड असेल. धाकट्या भावंडांची साथ मिळेल. आनंदाचे क्षण येतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदारांनी सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी नाव खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
उपाय गायीला हिरवा चारा खाऊ घाला
मिथुन
पैशाच्या बाबतीतील केलेले आश्वासन लोक पाळणार नाहीत. प्रवास करणे लागू शकते. प्रॉपर्टीच्या दृष्टीने अनुकूल वेळ आहे. प्रेमींसाठी अनुकूल काळ आहे. सगळ्या प्रकारे लाभाची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनात समाधान मिळेल. कष्टाच्या मनाने पैसा कमी आहे.
उपाय मारूतीला पंचामृताचा अभिषेक करावा.
कर्क
सगळ्या प्रकारच्या लाभाकरता अनुकूल काळ आहे. समाजात मानसन्मान वाढेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. छोट्या व्यवसाय सुरू करायच्या विचारात असाल तर चार लोकांचा सल्ला जरूर घ्या. या काळात जवळच्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. खर्चाचे प्रमाण कमी करा.
उपाय मंदिरात दुधाचे दान द्यावी
सिंह
तब्येतीची साथ असली तरीसुद्धा निष्काळजीपणा नको. स्वभावामध्ये उतावळेपणा येईल. पैशाची आवक मनासारखी असणार नाही. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा त्रास संभवतो. पैसा गुंतवताना खात्री करून घ्या. वैवाहिक जीवन मनासारखे असेल. छोट्या-मोठ्या अपघातापासून सावध रहा. मित्रांसोबत वेळ घालवाल.
उपाय गाईला चपाती आणि गूळ खाऊ घालावा
कन्या
पायाला इजा होण्याची शक्मयता आहे सांभाळून रहावे. बाकी तब्येत सुधारेल. पैशाच्या बाबतीत भाग्यवान असाल. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न जरूर करावा. कुटुंबाची काळजी असेल. प्रवास करणे शक्मयतो टाळावे. लहान भावांशी वाद संभवतो. लहानसहान कारणावरून प्रेमींमध्ये वाद होईल. नोकरीत कामाच्या बाबतीत सावध रहा.
उपाय दुरंगी कांबळे दान द्यावे
तुळ
बरेच दिवस रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. तब्येतीच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. जवळील व्यक्ती पैसे बुडवण्याची शक्मयता आहे. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत असलेले प्रŽ मार्गी लागतील. प्रेमींकरता आनंदाचा काळ आहे नोकरदार वर्गाने आपण केलेली कामे वरिष्ठांपर्यंत पोहोचवावीत. वैवाहिक जीवनात तणाव राहील.
उपाय छाया दान करा
वृश्चिक
व्यवसायात मंदी येण्याची शक्मयता आहे पण दैवी सामर्थ्याने त्यावर मात करून पुढे जाल. समाजातून लाभदायी घटना घडतील पण कायदाकानू तोडून कोणतेही कृत्य करू नये. मनामध्ये विचित्र विचार येतील पण डोके शांत ठेवणे आपल्या हिताचे आहे
उपाय गुरूवारी केशराचा टिळा लावावा.
धनु
संत दर्शनाचा लाभ होईल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. पण कामात चुका होणे किंवा कामे रेंगाळणे असे काहीसे होऊ शकते म्हणून महत्त्वाची कामे लवकर पूर्ण होतील असे शक्मयतो पहावे. कोणाच्याही घरचे खाणे टाळावे. बाधा होण्याचे योग होत आहेत. कागदपत्रे सांभाळा.
उपाय सोमवारी शिवालयात जाऊन अभिषेक करावा
मकर
वैवाहिक जोडीदाराकडून अचानक लाभाची शक्मयता निर्माण होईल. वडिलधार्या व्यक्तींना तीर्थयात्रेला पाठवावे असे वाटून त्यासाठी आपण योग्य ती तयारी कराल. जर कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर थोडे थांबावे. अचानक धनलाभाचे योग होण्याची शक्मयता आहे.
उपाय तांदूळ जलप्रवाह करावे
कुंभ
जोडीदाराला समजावून घेऊन पुढील पाऊल टाकावे. कोणत्याही कामांमध्ये घाई करू नये. अचानक घरामध्ये पाहुणे येण्याची शक्मयता आहे तरी आपण त्यांच्या सेवेमध्ये कोणताही प्रकारे चालढकल करू नये. वृद्ध मंडळींचे सहकार्य मिळेल व आपल्या भाग्यात भर पडेल.
उपाय विठ्ठलाला तुळशी वहावी
मिन
अति आत्मविश्वास नडू शकतो. गर्विष्ठ बोलल्यामुळे होणारे काम अडू शकते. गुप्त शत्रूंपासून जरा सांभाळूनच रहा. वैवाहिक जोडीदाराचा सल्ला आपल्याला उपयोगात येईल. काही चांगल्या गोष्टी घडून मन आनंदी असेल. भागीदारीमध्ये फायदा होईल
उपाय दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये देवीला गजरा वाहावा.