जेलभरो आंदोलनाने मराठा आरक्षणाची ठिणगी पडली; येत्या काळात तीव्र आंदोलनाचे संकेत; शेकडो आंदोलकांची अटक व सुटका
कोल्हापूर प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत वजा शब्द राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना दिला आहे. तत्पूर्वी आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास राज्यातील मराठा पेटून उठेल. याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा सकल मराठा समाजाने मंगळवारी जेलभरो आंदोलनाच्या माध्यमातून दिला. यावेळी आंदोलकांनी मानवी साकळी करत एक मराठा लाख मराठा…, आरक्षण आमच्या हक्काच…, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर शेकडो मराठा आंदोलकांना पोलीसांनी अटक कऊन काहीकाळानंतर सुटका केली.
मराठा आरक्षणासाठी मिरजकर तिकटी येथे जेलभरो आंदोलनाचा सकल मराठा समाजातर्फे इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
समन्वयक अॅङ बाबा इंदुलकर, चंद्रकांत पाटील, दिलीप देसाई, बाबा पार्टे, आर. के. पोवार, संजय पवार, विजय देवणे आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा बांधव मिरजकर तिकटी येथे एकवटले. या ठिकाणी आंदोलकांनी मानवी साखळी केली. हातात भगवे झेंडे घेतलेल्या मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा…, आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाचं…, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी दिलीप देसाई म्हणाले, राज्य सरकारच्या पातळीवर मराठा नेत्यांच्या गुप्त बैठका सुऊ असून हे निषेधार्ह आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष असूनही त्यांना विचारात घेतले जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसमितीचे अधिकार द्यावेत. सरकारने मनोज जरांगे-पाटील यांना आरक्षण 24 तारखेपूर्वी देण्याचा शब्द पाळावा. अन्यथा राज्यातील मराठा पेटुन उठेल हे सरकारने लक्षात घ्यावे.
राष्ट्रवादीचे काँग्रेस (शरद पवार गट)शहराध्यक्ष आर.के.पोवार म्हणाले, सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नसल्यानेच ते चालढकल करत आहेत. सरकारला जागे करण्यासाठीच जेलभरो आंदोलन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आदिल फरास म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वांचीच इच्छा आहे. आरक्षणासाठी आम्ही समाजासोबत आहोत. शिवसेना (उध्दव ठाकरे गट) सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय कोण देणार ? हे पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करावे. आरक्षणासाठी कोल्हापूरात केलेल्या आंदोलनाने राज्यात इतिहास रचला आहे. इथून पुढे विविध टप्प्यात जिल्हाभर आंदोलन केले जाईल. बाबा पार्टे म्हणाले, सरकारने मनोज जरांगे-पाटील यांना 24 तारखेपूर्वी आरक्षण देण्याचा दिलेला शब्द पाळावा, अन्यथा समाजाचा रोष सरकारला महागात पडेल.
जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील म्हणाल्या, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी सरकारचे हात का लटपटत आहेत? मराठा समाजाच्या खासदार आमदारांनी यामध्ये लक्ष घालून सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडावे.
अंजली जाधव म्हणाल्या, आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही.
यानंतर पोलीसांनी आंदोलकांना अटक कऊन पोलीस व्हॅनमधून अलंकार हॉल येथे नेले. तेथून काहीवेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात राजू जाधव, चंद्रकांत भोसले, नितीन पाटील, कमलाकर जगदाळे, जयकुमार शिंदे, दीपक दळवी, अभिषेक देवणे,किसन कल्याणकर, महादेव पाटील, माई वाडेकर, श्रध्दा महागावकर, वैशाली महाडिक, मंजित माने, उदय इनामदार, अविनाश दिंडे, निलेश लाड, धनाजी यादव, अमरसिंह निंबाळकर, प्रवीण पालव आदी सहभागी झाले होते.