कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने अंबाबाई परिसरातील चप्पल स्टॅन्ड हटवत धडक कारवाई केली आहे. प्रचंड मोठा पोलीस फाटा आणि जेसीबीच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी चप्पल स्टॅन्डचे मालक यांच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला असून मनसेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांना घटनास्थळी येण्याची आवाहन केले आहे.
वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी व्यवसाय करत असून याला आत्ताच का विरोध अशी चप्पल स्टॅन्ड मालक आणि कर्मचारी महिला विचारणा करत आहेत. यावेळी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुर्व्यवहार केल्याचा आरोप करत महिलांनी प्रशासनाचा विरोध केला आहे.









