समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांचे प्रतिपादन : वाळपई येथील दरबारातून अटल आसरा, जाती प्रमाणपत्र, जमीन मालकी मुद्यावर चर्चा
वाळपई : सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा फायदा ग्रामीण भागातील टोकापर्यंत जाणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र प्रशासनातील काही त्रुटींमुळे या योजना आवश्यक घटकापर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होत असतो. जनता दरबाराद्वारे प्रशासनातील त्रुटी दूर कऊन प्रत्येक घटकापर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. या दरबारात सर्वसामान्यांना बोलण्याची, आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळते. यातून सर्वसामान्य नागरिक व सरकारी यंत्रणा यांच्यात संवाद होऊन समस्यांचे निवारण होत असल्याचे प्रतिपादन समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. सत्तरी तालुक्मयात वाळपई नगरपालिका सभागृहामध्ये आयोजित जनता दरबारात ते बोलत होते. म्हापसा, पेडणे, डिचोली या जनता दरबाराच्या तुलनेत सत्तरीतील जनता दरबाराला चांगला प्रतिसाद लाभला. सुमारे 25 जणांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी विविध खात्याच्या सुमारे 50 पेक्षा जास्त प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर आमदार डॉ. देविया राणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रोहित कदम, पोलीस उपधीक्षक सागर एकोस्कर, सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, पुरातत्त्व खात्याचे संचालक डॉ. निलेश फळदेसाई, तालुक्मयाचे मामलेदार दशरथ गावस, जिल्हा पंचायत सभासद देवयानी गावस, सगुण वाडकर, राजश्री काळे, वाळपई नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सयाजीन शेख, गोमेकॉचे मेडिकल सुप्रिटेंडट डॉ. राजेश पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, विनोद शिंदे व इतरांची उपस्थिती होती.
जनता दरबारात सादर केलेल्या अनेक समस्यांचे व्यवस्थित निवारण करण्यात येणार आहे. दुसऱ्या जनता दरबाराच्यावेळी यामध्ये कोणत्या दुऊस्त्या केल्या याचा अहवाल सादर करून तो जनतेपुढे मांडणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्याचे निर्देश समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांना दिल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. देविया राणे यांनी, अशा उपक्रमाद्वारे अंत्योदय तत्त्वावर विकास घडवून आणण्याच्या कामाला प्राधान्य प्राप्त होणार आहे. जना दरबाराद्वारे सर्वसामान्य नागरिकांना योजनांची माहिती मिळणार आहे. तसेच नागरिकांच्या प्रस्तावांना चालना मिळून विकास कामे शक्मय तेवढ्या लवकर हातावेगळी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सत्तरी तालुक्मयातील अनेक प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले डिचोली तालुक्मयातील चंद्रकांत शेटकर यांनी डिचोली नगरपालिकेमध्ये अडकलेल्या कामांचा प्रŽ उपस्थित केला व तो प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली. अडवई येथील राजेंद्र देसाई यांनी शेती बागायतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली. शेळप बुद्रुक सत्तरी येथील अटल आवास योजनेंतर्गत घर दुऊस्तीचा प्रस्ताव रोखण्याचा प्रŽ तृप्ती तुळशिदास यात्रेकर यांनी उपस्थित केला व त्या संदर्भात सहकार्य करण्याची विनंती केली. सावर्शे येथील झिलू गावकर, शिरोली येथील सीताराम गावस यांनी जमिनीचा प्रŽ उपस्थित करून मालकी कधी मिळणार असा प्रश्न केला.
कदंबा बस, रस्त्यावरील झुडपे कधी हटविणार : उदयसिंग राणे
ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीतपणे व्हावी यासाठी ग्रामीण भागात कदंब बसेसची व्यवस्था केली होती, मात्र सदर बसेसची व्यवस्था अनियमित झालेली आहे. अडवईतून सुरू झालेली कदंब बस अनियमित असल्यामुळे 50 विद्यार्थ्यांना याचा फटका बसतो, असा प्रŽ सरपंच उदयसिंग राणे यांनी उपस्थित केला.सांखळी नगरपालिकेच्या नगरसेविका शुभदा सावईकर यांनी गुळेली येथील नदीवर पदपूल व बंधारा बांधण्याची विनंती केली. सदर भागातील जमीन ही वनखात्याची आहे. जोपर्यंत त्यांचा ना हरकत दाखला मिळत नाही तोपर्यंत हे करणे शक्मय नसल्याचे पंचायतीचे सरपंच नितेश गावडे यांनी स्पष्ट केले. बाराजण येथील विठोबा नारू गावकर या अपंग व्यक्तीना सरकार नोकरी कधी देणार असा प्रश्न केला.
अटल आसरा, ओबीसी प्रŽाकडे लक्ष द्या
धनगर समाजाचे नेते बि. डी. मोटे यांनी धनगर बांधवांसाठी कार्यरत असलेल्या अटल असरा योजनेचा मुद्दा उपस्थित केला. यात कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अनेक अडचणी येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यात सुटसुटीतपणा आणावा अशी मागणी केली. त्याचप्रमाणे या बांधवांना इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. त्यावर अतिरिक्त जिल्हाधिकारी रोहित कदम यांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले. सोनाळ येथील द्वारकी भिगो कोपर्डेकर, राजेंद्र कुंडेणेकर वाळपई यांनी घर दुऊस्तीसाठी आर्थिक मदत करण्याची मागणी केली. यशोदा सत्यवान गावडे करंझोळ यांनी गावांमध्ये गढूळ पाणी येत असल्याचा समस्या उपस्थित केली.
वाळपई पालिका क्षेत्रात बेकायदा कामे : काणेकर
समाज कार्यकर्ते सदानंद काणेकर यांनी, वाळपई नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामाना ऊत आलेला आहे. प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. यामुळे वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असते. वाळपई भागांत कार्यरत असलेले नगर व नियोजन खात्याची यंत्रणा पूर्णपणे निषक्रिय पद्धतीने वावरत असल्याचा आरोप केला. ऑनलाइन पद्धतीने जात व रहिवासी दाखला देण्याची सुविधा सरकारने उपलब्ध केलेली आहे. मात्र त्यात अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करण्याची मागणी होंडा या ठिकाणी सीएससी केंद्र चालविणारे कल्पेश गावस यांनी उपस्थित केला. वाळपई येथील चांद बी. अकबर खान यांनी रेशन कार्डचा मुद्दा उपस्थित केला. तर होंडा पंचायतीचे पंच सभासद दीपक गावकर यांनी अटल आश्र्रय योजना व घर नंबर देण्यासंदर्भाची प्रक्रिया करण्याची मागणी केली. शेतकरी बातू आपा गावडे यांनी करंझोळ शेतीचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी होंडा पंचायतीचे सरपंच शिवदास माडकर, ठाणे पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे उपस्थित करून विशेष लक्ष देण्याची मागणी केली. सुऊवातीला मेधावी मांजरेकर, स्नेहा चोडणकर, मीनाक्षी नाईक, श्रेया नार्वेकर, तनुजा दासार, अक्षता दासार, मनीषा कवळेकर, पूर्वी फडते, साची खोडगिणकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. सुऊवातीला मामलेदार दशरथ गावस यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन उदय सावंत यांनी केले तर उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी आभार मानले.









