पळून जाणाऱ्या कारचालकाला अटक
पणजी : ओल्ड गोवा बायपास रस्त्यावर एका कारने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारचालक व त्याच्या सोबत असलेल्या साथीदारांना ओल्ड गोवा पोलिसांनी मोले चेकपोस्टवरून कारसह ताब्यात घेतले आहे. कारचालका विरोधात भादंसं कलम 279, 304, तसेच मोटर कायदा कलम 134 (ए) (बी) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव हरालाल मुर्मू (पश्चिम बंगाल) तर संशयिताचे नाव बाबू कुमार (वय 25 बेंगळुरू कर्नाटका) असे आहे. अपघाताची घटना रविवारी रात्री घडली.
संशयित बाबू कुमार व त्याचे साथिदार केए-03-एनएम-7907 क्रमांकाच्या अरटीका कारने पर्यटक म्हणून गोव्यात आले होते. रविवारी रात्री ते परत जात असताना त्यांच्या कारने ओल्ड गोवा बायपास रस्त्यावर हरालाल मुर्मू याला रस्ता ओलंडत असताना धडक दिली. हरालाल जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला असता त्याला त्याच स्थितीत सोडून संशयितांनी घटनास्थळावरून पोबारा केला. नंतर घटनास्थळावर जमा झालेल्या लोकांनी हरालाल याला गोमेकॉत नेले. मात्र त्याच्यावर उपचार सुऊ असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत ओल्ड गोवा पोलिसांनी त्वरीत घटनेची नोंद करून संशयितांची माहिती मिळविली व सर्व सिमेवरील चेकपोस्टला त्याची माहिती दिली. संशयित मोले मार्गे कनार्टकात पळून जाण्याच्या स्थिती असताना मोले चेकपोस्टवर असलेल्या पोलासंनी त्यांना अडविले. दरम्यन ओल्ड गोवा पोलीस मोले चेकपोस्टवर दाखल झाले आणि त्यांनी संशdियातांना कारसह ताब्यात घेतले.