मुंबई
हिरो मोटोकॉर्पचे समभाग सोमवारी आठवड्याच्या दिवशी जवळजवळ 3 टक्के इतके घसरणीत असताना दिसले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पवन मुंजाल यांच्यावर दिल्ली पोलिसांनी खोट्या माहितीप्रकरणी एफआयआर दाखल केले आहे. या बातमीचा नकारात्मक परिणाम कंपनीच्या समभागावर सोमवारी पाहायला मिळाला. पवन मुंजाल यांची आधीपासूनच महसूल संचलनालय व अंमलबजावणी संचलनालय (इडी) यांच्याकडून चौकशी सुरु आहे.









