वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी काळात आपण विमानाने प्रवास करण्याची इच्छा बाळगत असाल तर आपल्याला विमान प्रवासासाठी ज्यादा खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. येणाऱ्या काळात विमान तिकीटाचे दर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आगामी काळामध्ये हवाई क्षेत्रातील कंपन्यांकडून विमान तिकीट दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात इंडिगो एअरलाइन्स यांना 6 ऑक्टोबर पासून इंधनावर अतिरिक्त शुल्क लागू झाले आहे. यानंतर विमान प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी लागणाऱ्या इंधनावरती अतिरिक्त शुल्क लावले गेल्याने इंडिगो एअरलाइन्सला आता लवकरच तिकीट दर वाढवणे अपरिहार्य ठरणार आहे. काही काळापूर्वीच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वृद्धीसुद्धा केली होती. हा सारा वाढता भार तिकीट दर वाढवून कमी करण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जाणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये विमानाकरता लागणाऱ्या इंधन दरामध्ये सातत्याने वाढ होत आली आहे. या किमत वाढीचा परिणाम कंपनीच्या एकंदर अंतर्गत खर्चावर खऱ्याअर्थाने पडत आला आहे.
बघुया किती शुल्क आकारले जात आहे ते
? 500 किलोमीटरच्या प्रवासासाठी 300 रुपये
? 501 ते 1 हजार किलोमीटरच्या अंतरासाठी 400 रुपये
? 1001 ते 1500 किलोमीटरसाठी 550 रुपये
? 1501 ते 2500 किलोमीटरसाठी 650 रुपये
? 2501 ते 3500 किलोमीटरसाठी 800 रुपये
? 3501 किलोमीटर आणि त्यापेक्षा जास्तकरिता 1 हजार रुपये









