खर्चात वाढीमुळे दरात वाढ करणार
नवी दिल्ली
पोलाद निर्मितीसाठी कोळशाचा वापर केला जातो. एकंदर निर्मिती खर्चामध्ये झालेल्या वाढीमुळे पोलाद उत्पादक कंपन्या आगामी काळामध्ये पोलादाच्या किमती वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरवाढीमागे पोलाद उत्पादन करण्यासाठी येणाऱ्या खर्चामध्ये वाढ झाल्याचे कारण कंपन्यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलादाच्या किमती डिसेंबरपर्यंत 25 डॉलर ते 50 डॉलर प्रति मेट्रिक टन वाढू शकतात. पोलाद निर्मितीसाठी लागणारा कोकिंग कोळसा हा ऑस्ट्रेलिया, रशिया आणि इतर देशांमधून भारतामध्ये आयात केला जातो. गेल्या काही दिवसांपासून कोकिंग कोळशाच्या आयातीसाठी येणारा खर्च वाढला असल्याने पोलाद उत्पादन कंपन्यांवरती त्याचा थेपटणे दबाव वाढला आहे. याच अनुषंगाने पाहता पोलाद कंपन्या पोलादाच्या किंमती वाढवू शकतात.









