मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय ‘रेड रन 20233’ उपक्रम उत्साहात
पणजी : निरोगी शरीरात निरोगी मन नांदत असते आणि निरोगी समाज तसेच प्रगतीशील राष्ट्र निर्माण करण्यासाठी या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बांबोळी येथे काल रविवारी उत्साहात पार पडलेल्या राष्ट्रीय ‘रेड रन 2023’ या एड्स जागृतीसाठी आयोजित केलेल्या धावण्याच्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिपादन केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, एड्सबाधित लोकांप्रती जनजागृती आणि सर्वसमावेशकतेची तसेच मैत्रीची भावना निर्माण करण्यात सामाजिक संस्था आणि ‘नॅको’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एक काळ असा होता जेव्हा जग एड्सच्या ऊग्णांकडे तुच्छतेने पाहत असे, त्यांना वेगळे ठेवायचे, त्यांचा अपमान करायचे. एड्स बाधित व्यक्तींविऊद्ध सर्व प्रकारचे पक्षपात नष्ट करणे गरजेचे आहे. एड्सग्रस्त व्यक्तींविऊद्ध कोणतेही गैरवर्तन किंवा पक्षपात होत असल्यास त्याची तक्रार करण्यासाठी 1097 हेल्पलाईन वापरावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या संचालक निधी केसरवानी, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त सचिव आणि महासंचालक व्ही. हेकाली झिमोमी तसेच आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. गीता काकोडकर, प्रकल्प संचालक डॉ. गोकुळदास सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते.
युवकांना धोक्यांपासून दूर ठेवावे
आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, नॅकोने हॉटेल, रेस्टॉरंट आणि किनारी भागात दवाखान्यांना सुरक्षा उपाय उपलब्ध करून देणारी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत. एड्सबद्दल बोलण्यास लाजण्यासारखे काही नाही. तऊण पिढीसाठी साथीदारांचा दबाव धोकादायक ठरत आहे. अशा प्रकारच्या दडपणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालकांनी मुलांना मदत करावी आणि तऊण पिढीला धोकादायक गोष्टींपासून दूर ठेवावे.
देशभरातील 157 जण सहभागी
‘राष्ट्रीय रेड रन 2023’ कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांनी उत्साह आणि जोमाने 10 किमी, 2 किमी व उत्साह अशा तीन श्रेणींमध्ये भाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या सहकार्याने केले होते. रन सुरू होण्यापूर्वी निधी केसरवानी यांनी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (एसएजी) बांबोळी मैदानावर हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुऊवात केली होती. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 157 जण सहभागी झाले होते. तीनही गटांतील विजेत्यांना मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसे, चषक आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्थेने काढलेल्या जीआयएस अॅटलसचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. डॉ. गोकुळदास सावंत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सहसंचालक उमाकांत सावंत यांनी आभार मानले.









