पंडितवाडा-फोंडा येथील प्रकाराने वाहनचालक संतप्त : पोलिसांच्या निक्रियतेचे दर्शन
फोंडा : पंडितवाडा -फोंडा येथे भर रस्त्यात क्रेन आडवी घालून एका खासगी आस्थापनाचा माल खाली करण्याच्या प्रकारामुळे तब्बल अर्धा तास वाहतूक खोळंबून राहिली. येथील केशवदेव मंदिराजवळील अंतर्गत रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. फोंडा पोलिसांना या संतापजनक प्रकाराची माहिती देऊनही त्यांनी कारवाईसाठी कुठलेच स्वारस्य न दाखविल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहे.
रविवारी सायंकाळी 7.30 वा. सुमारास येथील अंतर्गत रस्त्यावर एका खासगी आस्थापनाचा माल खाली करण्यासाठी ही क्रेन बोलवण्यात आली होती. संपूर्ण रस्ता बंद कऊन वाहतुकीला वेठीस धरीत हा प्रकार तब्बल अर्धा तास सुऊ होता. त्यामुळे या रस्त्यावऊन दोन्ही बाजूने वाहतूक करणारी वाहने अडकून पडली. चारचाकी वाहने सोडाच दुचाकीही जाण्यासाठी रस्ता मोकळा नसल्याने काही वाहन चालकांनी संबंधीत आस्थापनचालकाला क्रेन जरा बाजूला करण्याची विनंती केली. मात्र त्या आस्थापनचालकाने हा रस्ता आपली खासगी मालमत्ता असल्याची भाषा करीत क्रेन रस्त्यावऊन हलविणार नसल्याचे वाहनचालकांना सुनावले. तुम्ही जायचे असल्यास दुसऱ्या मार्गाने म्हणजे वारखंडेकडून वळसा घालून जा अशी मुजोरीची त्याची भाषा होती. त्याचा हा उन्मत्तपणा पाहून काही वाहनचालकांनी थेट फोंडा पोलीस स्थानकाशी संपर्क साधून रस्ता अडविल्याची फोनवर तक्रार केली. कहर म्हणजे, अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळावर पोचण्यासाठी अर्धा तासापर्यंत पोलीस वाहन पोचू शकले नाही. त्यामुळे पोलिसांच्या अकार्यक्षमतेवरही याठिकाणी अडकून पडलेल्या वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.
कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता सायंकाळी वाहतुकीची वर्दळ असताना संबंधीत आस्थापनचालकाने सार्वजनिक रस्ता अडवून धरला. क्रेनचालकाला आपण वाहतूक वेठीस धरीत असल्याचे भान नव्हते. त्यामुळे अनेक वाहनचालकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना रस्ता अडवायचाच होता तर रात्री उशिराही हे काम करता आले असते. रस्ता बंद करण्याची पूर्व परवानगी घेतली होती तर, वारखंडे नाका व पंडितवाडा नाक्यावर पोलीस ठेऊन रस्ता बंद असल्याची कल्पना वाहनचालकांना देणे गरजेचे होते. आता या प्रकरणी पोलीस कोणती कारवाई करतील याकडे वाहनचालकांचे लक्ष लागून राहिले आहे.









