विल्यमसन, साउदी आजही खेळण्याची शक्यता कमीच, लॅथमच सांभाळणार किवींचे नेतृत्व
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात आपले सुऊवातीचे सामने खेळल्यानंतर न्यूझीलंड आणि नेदरलँड्स आज सोमवारी येथे आमनेसामने येणार आहेत. किवींनी गुऊवारी गतविजेत्या इंग्लंडविऊद्ध स्पर्धेचा पहिला सामना खेळला आणि 2019 च्या विजेत्यांना नऊ गडी राखून पराभूत करत पुन्हा एकदा स्पर्धेत मोठी मोजल मारण्याचा इरादा दाखवला.
इंग्लंडने नऊ गड्यांच्या मोबदल्यात 282 धावा केल्या होत्या, तरीही डेव्हॉन कॉनवे (नाबाद 152) आणि रचिन रवींद्र (नाबाद 123) यांच्या धमाकेदार खेळीमुळे न्यूझीलंडने 36.2 षटकांत लक्ष्य गाठले. विशेष म्हणजे न्यूझीलंडने त्यांचा नियमित कर्णधार केन विल्यमसन खेळत नसताना हा विजय मिळवला. विल्यमसन या वर्षाच्या सुऊवातीला ‘आयपीएल’दरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरून पूर्ण तंदुरुस्त होऊ शकलेला नाही. इंग्लंडविऊद्ध संघाचे नेतृत्व केलेला टॉम लॅथम सोमवारी देखील कर्णधारपद सांभाळेल. कारण किवी मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सूचित केले आहे की, विल्यमसन अद्याप डचविऊद्ध खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.
केनची चांगली प्रगती होत आहे. मला वाटते की, क्षेत्ररक्षणासाठी त्याला अजूनही आणखी तंदुरुस्त व्हावे लागेल, असे स्टेड यांनी रविवारी सांगितले. परंतु विल्यमसन खरोखरच चांगली प्रगती करत आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, तो आमच्यासाठी तिसरा सामना खेळू शकेल’, असे ते पुढे म्हणाले. अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साउदीचा संघात समावेश होण्याचीही शक्यता कमी आहे, कारण तो अंगठ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. तर सहकारी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन रविवारी तंदुरुस्तीच्या चाचणीत उत्तीर्ण झाल्यास तो उपलब्ध होईल.
डचसाठी शुक्रवारची पाकिस्तानविऊद्धची लढत खडतर राहून त्यात पाक 81 धावांनी जिंकले. तथापि, सामन्यात डच संघाचेही असे काही क्षण राहिले. विशेषत: सामन्याच्या सुऊवातीस ते पॉवरप्लेमध्ये तीन पाकिस्तानी फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरले. तसेच सलामीवीर विक्रमजित सिंग (52) आणि बास डी लीडे (67) यांनी जोरदार झुंज दिली, पण तरीही ते कमी पडले. डच गोलंदाजी चांगली दिसत असली तरी, त्यांच्या फलंदाजीला विशेषत: मधल्या फळीला, अधिक सातत्य आवश्यक आहे. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला मागील चार एकदिवसीय सामन्यांमध्ये 30 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. एकदिवसीय लढतींत दोन्ही संघ आतापर्यंत चार वेळा आमनेसामने आले असून न्यूझीलंडने सर्व सामने जिंकलेले आहेत.
संघ : नेदरलँड्स : स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन एकरमन, वेस्ली बॅरेसी, बास डी लीडे, आर्यन दत्त, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रायन क्लेन, तेजा निदामनुऊ, मॅक्स ओ’डॉड, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, लोगन व्हॅन बीक, रोएलओफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मिकरेन, विक्रमजित सिंग.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









