संदीप कांबळे / पणजी
आकार, चव आणि सुगंधासाठी अद्वितीय असणारा नीलम तसेच चवीला सौम्य आणि हिरवट रंगाचा, पोपटाच्या चोचीसारखा दिसणारा तोतापुरी हे दोन्ही प्रकारचे आंबे ऑफ सिझनमध्ये पणजी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑफ सिझनमध्येही नागरिकांना या दोन्ही आंब्याची चव चाखता येणार आहे.
पणजी मार्केटमध्ये नीलम व तोतापुरी हे दोन्ही आंबे दाखल झाले असून, साधारणत: 250 ऊपये किलो या दराने विकले जात आहेत. सिझन नसतानाही उपलब्ध झालेल्या व त्यांची विक्री करणारे व्यावसायिक इस्माईल खटगी यांनी सांगितले की, नीलम या जातीचा आंबा आंध्रप्रदेश येथून आयात करण्यात आलेला आहे. सध्या ऑफ सिझन असतानाही तो बाजारात मिळत असल्याने लोकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत तो मोठ्या प्रमाणात दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तोतापुरी आंबा कर्नाटक राज्यातून गोव्यात आला असून, तो सध्या पणजी मार्केटमध्ये उपलब्ध झालेला आहे. कर्नाटक हे गोव्याच्या शेजारी असलेले राज्य असल्याने एका दिवसात तो दाखल होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आंबे खरेदीसाठी नागरिकांची पणजी मार्केटमध्ये गर्दी होताना दिसत आहे.
नीलम आंबा हा आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आंबा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जेव्हा ते पिकते तेव्हा फळ सुंदर पिवळ्या – सोनेरी रंगात बदलते. ह्या आंब्याची चव आंबट–गोड आहे तसेच ह्या आंब्याला फुलासारखा सुगंध येतो. हा आंबा त्याच्या आकार, चव आणि सुगंधासाठी ओळखला जातो. हा आंबा जून महिन्यात उशिरा येतो. हा एक उच्च दर्जाचा तंतू विरहित आंबा आहे.
तर तोतापुरी हा आंबा चवीला सौम्य आणि हिरवट रंगाचा असतो. हा आंबा पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यात प्रामुख्याने याचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. तोतापुरी आंब्यामध्ये आढळणारे पोषक तत्व हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास प्रोत्साहन देतात. याचे कारण म्हणजे त्यात भरपूर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, दोन खनिजे जे रक्तवाहिन्या शिथिल करण्यास, हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. हे रक्तातील ट्रायग्लिसराइड्स, फ्री फॅटी ऍसिडस् आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करू शकते.
गोव्यात हंगाम नसताना तोतापुरी आणि नीलम आंबे दाखल झाले असून, महाराष्ट्रातील हापूस आंबा नोव्हेंबर अखेरीस तयार होईल. हा आंबा सर्वप्रथम विदेशात पाठवला जातो अवघ्या काहीजणांची मागणी असेल तर त्याचे गोव्यात सुरवातीच्या काळात आगमन होते.
पिकलेले आंबेही उपलब्ध
पणजी मार्केटमध्ये नीलम या जातीचे आंबे पिकलेले उपलब्ध असून, त्यांचा दर आकारानुसार आहे. साधारणत: 250 ऊपये किलो या दराने सध्या विक्री सुरू आहे. तर तोतापुरी आंबेही याच दराने









