बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना संघाने रॉर्जर क्रिकेट संघाचा 30 धावाने तर आनंद क्रिकेट अकादमीने रॉर्जर क्रिकेट क्लबचा 8 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. पार्थ मालगावी (आनंद), ओंमकार चौगुले (जिमखाना) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
केएससीए बेळगाव मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 31 षटकात सर्व गडीबाद 99 धावा केल्या. त्यात ओंमकार चौगुलेने 2 चौकारासह 18, अर्जुन येळ्ळूरकरने 14, तर हमजा शराफने 10 धावा केल्या. रॉर्जरसतर्फे श्रेयांश पाटीलने 22 धावात 3, रजत शंभुचेने 18 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युतरादाखल खेळताना रॉर्जर क्रिकेट क्लबचा डाव 30.5 षटकात सर्व गडीबाद 69 धावात आटोपला. त्यात प्रतिक कारेकरने 23 धावा केल्या. त्याच्या वितरीत एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. जिमखानातर्फे ओंमकार चौगुलेने 25 धावात 6 गडीबाद करीत निम्याहून अधिक संघ गारद केला. त्याला आतीत भोगनने 2, तर नमन व अब्बास यानी प्रत्येकी 1 गडीबाद केला.
हुबळी येथे गुरूवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात रॉर्जर क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 23. षटकात 9 गडीबाद 61 धावा केल्या. त्यात प्रतिक कारेकरने 2 चौकारासह 16, गौतम मादार व रजत शंभुचे प्रत्येकी 11 धावा केल्या. आनंदतर्फे पार्थ मालगावीने 12 धावात 5 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 9 षटकात 2 गडीबाद 62 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात स्कंध शेट्टी व प्रथम राज गोलीहळ्ळी यांनी 2 चौकारासह 18 धावा केल्या.









