वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलची प्रकृती बिघडली असून त्याला गेल्या दोन दिवसांपासून तापाने चांगलेच त्रासले आहे. शुक्रवारी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याला डेंग्यूची बाधा झाल्याचे आढळून आले.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर येत्या रविवारी चेन्नईत खेळवला जाणार आहे. या सामन्यात गिल खेळण्याची शक्यता कमी असल्याने इशान किसनला सलामीचा फलंदाजी करावी लागेल. या व्याधीतून बरे होण्यासाठी गिलला आणखी आठ ते दहा दिवस लागतील असे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.









