बाहुलीने केले अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त
1906 मध्ये एका इसमाने रॉबर्ट यूजीन ओटो नावाच्या मुलाला एक बाहुली भेटवस्तू म्हणून दिली होती. या इसमाने वैमनस्यापोटी या बाहुलीवर काळी जादू केली होती असे सांगण्यात येते. रॉबर्ट या बाहुलीला स्वत:ची चांगली मैत्रिण मानू लागला. तो बाहुलीसोबत खेळायचा, रॉबर्ट बाहुली नव्हे तर तिला खरा मनुष्यच समजू लागला होता. रॉबर्टच्या खोलीत कायम पसारा असायचा. बाहुली सामान फेकत असल्याचे रॉबर्टने सांगितल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याला चांगलेच सुनावले होते. एकेदिवशी रॉबर्टनुसार बाहुली खूर्चीवर बसली असताना गोष्टी हवेत उडू लागल्या आणि दरवाजे वारंवार उघडू अन् बंद होऊ लागले. रॉबर्ट ओरडल्यावर त्याचे आईवडिल खोलीत पोहोचले असता सर्वकाही शांत झाले हेते.

तर रॉबर्टच्या शेजाऱ्यांनुसार बाहुलीला घरात चालता फिरताना अन् बोलताना पाहिले आहे. रॉबर्टच्या खोलीतून अनेकदा विचित्र आवाज यायचे. बाहुली संतापात फर्निचरही तोडून टाकत होती असे रॉबर्टचे सांगणे होते. रॉबर्टच्या घरासोबत त्याच्या शेजाऱ्यांच्या घरांमध्येही अनेक भयावह घटना घडू लागल्या होत्या. यानंतर बाहुलीला एका बॉक्समध्ये बंद करण्यात आल्यावर या घटना थांबल्या. काही वर्षांनी रॉबर्ट स्वत:च्या दैनंदिन आयुष्यात व्यग्र झाला. तसेच रॉबर्ट विवाह करून पत्नीसोबत नव्या घरात राहण्यास गेला आणि बाहुली समवेत अन्य सामग्री तेथे घेऊन गेला.
पत्नीही झाली त्रस्त
या घरात रॉबर्टने बाहुलीसाठी स्वतंत्र खोली निर्माण केली होती, यामुळे त्याची पत्नी अत्यंत त्रस्त असायची. पत्नीने रॉबर्टकडे बाहुलीला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मग पुन्हा बाहुलीचे कारनामे सुरू झाले. घरात अजब आवाज ऐकू येऊ लागले. 1974 मध्ये रॉबर्टच्या मृत्यूनंतर हे घर अन्य कुटुंबाने खरेदी केले. या कुटुंबातील मुलीने बाहुली जिवंत असून ती आपल्याला मारू इच्छित असल्याचे सांगितले होते. 1994 मध्ये या बाहुलीला संग्रहालयाच्या स्वाधीन करण्यात आले होते.
संग्रहालयात बाहुली
अनेकदा काचेच्या डब्यात ठेवण्यात आलेल्या बाहुली व्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टी विखुरलेल्या आढळून येतात आणि मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू येतो. यामुळे संग्रहालयात देखील बाहुलीसाठी स्वतंत्र केबिन तयार करण्यात आली. या बाहुलीचे विनाअनुमती छायाचित्र काढल्यास ती शाप देते असे सांगण्यात येते. एका पर्यटकाने जेव्हा द रॉबर्ट द डॉलचे छायाचित्र विनाअनुमती काढल्यावर कॅमेऱ्यातील सर्व छायाचित्रे गायब झाली होती.









