गोदरेजचे समभाग तब्बल 20 टक्क्यांनी वधारले : निफ्टीही 19650 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वीमासिक पतधोरण बैठकीमध्ये रेपोदरात कोणताही बदल न करता तो कायम ठेवण्यात आला आहे. सदरच्या घटनेचा परिणाम हा बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले आहेत.
भारतीय बाजारात सेन्सेक्स दिवसअखेर 362 अंकांनी वधारले तर निफ्टीही 108 अंकांनी मजबूत राहिले आहेत. भारतीय बाजारात गोरदरेज इंडस्ट्रीजचे समभाग हे 20 टक्क्यांनी मजबूत राहिले, तर मेट्रो बाँडचे समभाग मात्र प्रभावीत होत बंद झाले आहेत.
सप्ताहातील अंतिम सत्रातील कामगिरीत सेन्सेक्स 364.06 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 0.55 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 65,995.63 वर बंद झाला आहे. ध्gसऱ्या बाजूला निफ्टी 107.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 19,653.50 वर बंद झाला आहे. सेन्सेक्स मधील 23 समभागांमध्ये तेजीचा कल राहिला होता.
आरबीआय च्या पतधोरण बैठकीनंतर रेपोदर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. आरबीआय बँकेने आपल्या निश्चित केलेल्या रेपोदर हा कायम ठेवला असल्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
13 मुख्य निर्देशांकांची बाजी
भारतीय शेअर बाजारात रियल्टी, वाहन आणि वित्तीय क्षेत्रांचे समभाग हे 0.35 ते 1 टक्क्यांनी वधारले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक हे 0.4 ते 0.7 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत.
मुख्य कंपन्यांमध्ये गोदरेज इंडस्ट्रीजचे समभाग हे 19.64 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह महिंद्रा हॉलीडेज 7.64, गोदरेज अग्रोवेट 7.35 टक्क्यांनी मजबूत झाले. भजाज फिनसर्व्ह 5.97, एनबीसीसी इंडिया 5.71 तर टायटन, इंडसइंड बँक, आयटीसी, इन्फोसिस, टेक महिंद्रा यांचे समभाग तेजीत होते. याच्या विरुद्ध बाजूला ईडलवीज फायनाशिअल 5.54 टक्क्यांनी प्रभावीत झाले. यात मेट्रो ब्रँड्स 3.55 टक्के, ओमॅक्स 2.88 नुपुर रिसाइक्लर्स 2.59 , सुप्रिया लाइंफ सायन्स हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, भारती एdाटेल , नेस्ले यांचे समभाग घसरले आहेत.









