नवी दिल्ली
जिओमार्टवर आता व्हॉटसअॅपच्या मदतीने मासिक ऑर्डरमध्ये जवळपास 7 पट वाढ झाली असल्याची माहिती आहे. जिओ मार्ट आणि व्हॉटसअॅप यांना एकत्रित काम करुन एक वर्ष झाले असून जिओने भारतीय रिटेल क्षेत्रातील ही सर्वात यशस्वी भागीदारी राहणार असल्याचे म्हटले आहे. जिओ मार्टचे म्हणणे आहे की, व्हॉट्सअॅपद्वारे मासिक ऑर्डर्सची संख्या गेल्या एका वर्षात सात पटीने वाढली आहे.
जिओ मार्ट आणि व्हॉटसअॅपच्या भागीदारीमुळे लोकांसाठी ऑनलाइन खरेदी करणे सोपे झाले आहे, विशेषत: ज्यांना पूर्वी ऑनलाइन खरेदी करण्यास संकोच वाटत होता. वापरण्याच्या या सुलभतेमुळे व्हॉट्सअॅपद्वारे दर महिन्याला जिओ मार्टवर खरेदी करणाऱ्या नवीन ग्राहकांच्या संख्येत सहा पटीने वाढ झाली आहे.
मेटा इंडियाच्या उपाध्यक्षा संध्या देवनाथन म्हणाल्या, ‘जिओ मार्ट आणि व्हॉटसअॅपवर खरेदीचा अनुभव हा ऑनलाइन खरेदी करण्याचा एक नवीन आणि नाविन्यपूर्ण मार्ग आहे. मेटा या भागीदारीमुळे आनंदित आहे आणि परिणामी जिओ मार्टच्या विक्रीत आणि नवीन ग्राहकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे दर्शविते की व्यवसाय आणि लोक त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी मेसेजिंगचा वापर करण्यास प्राधान्य देतात कारण ते जलद आणि अधिक सोयीस्कर आहे.









