गोवा येथील एक ताब्यात ; १३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी
बांदा
दोडामार्ग – तिलारी नगर मार्गावर इन्सुली एक्साइजच्या पथकाने गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई केली. यात ३ लाख ८८ हजार ८०० रुपयांच्या दारुसह १३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यात दारुचे ४५ बॉक्स जप्त करण्यात आले. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी ईश्वर रणजित सिंग (३१, रा. मांद्रे गोवा) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज पहाटे ३.१० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सदर कारवाई प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदिप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान प्रसाद माळी, रणजित शिंदे यांच्या पथकाने केली.









